इन्को व्हॅक लसीकडे नागरिकांची पाठ | पुढारी

इन्को व्हॅक लसीकडे नागरिकांची पाठ

पिंपळे गुरव (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वैद्यकीय विभाग वतीने वय वर्ष साठ व पुढील नागरिकांना इन्को व्हॅक लस प्रिकॉशन डोस (ज्यांना कोविल्ड शिल्ड आणि को व्हॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोस नंतर सहा महिने किंवा सव्वीस आठवड्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे) ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अप पद्धतीने नाकावाटे देण्याचे सांगण्यात आले. मात्र, सांगवीच्या केंद्रावर या लसीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इन्को व्हॅक लस दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथी या लाभार्थ्यांना प्राध्यान्याने देण्यात यावी, असेही या वेळी सांगण्यात आले.

पालिका विभागाकडून प्रिकॉशन डोस लसीकरणसाठी सांगवीतील अहिल्या देवी होळकर लसीकरण केंद्रावर उपलब्ध केले असतानाही गेल्या चार दिवसात मात्र ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीय पंथी वर्गाने लसीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. केंद्रावर इनको व्हॅक लस प्रिकॉशन डोस सुसज्ज व्यवस्था केली आहे. परंतु दिसभरातून लाभार्थी लस घेण्यासाठी येत नसल्याने दिवसभरात केंद्रात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पालिकेने सकाळपासून संध्याकाळी साडेचार ही वेळ उपलब्ध केली गेली आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत असूनही डोसबदल अनास्था दिसून येत आहे.

Back to top button