पारगाव सा. मा. परिसरात कचर्‍याचे ढीग | पुढारी

पारगाव सा. मा. परिसरात कचर्‍याचे ढीग

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथे गाव परिसरात कचर्‍याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावात ठिकठिकाणी चौकात कचरा पडलेला दिसत आहे. ओला, सुका व प्लास्टिकच्या कचर्‍याचा समावेश आहे. पारगाव सा. मा. बाजारपेठेत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असल्याने परिसरातील ग्राहकही येथे खरेदीसाठी येत असतात. जसजशी बाजारपेठ मोठी होईल तसतशी गावातील व परिसरातील कचर्‍याची समस्या वाढत जाणार आहे. सध्याही गावात व चौकात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, नदीपात्रालगत कचरा अस्ताव्यस्त टाकला जातो. परिणामी, अशा ठिकाणी दुर्गंधी व घाणीचे साम—ाज्य निर्माण होत आहे.

पारगाव चौक हा हळूहळू मोठा होत आहे. शिरूर-सातारा व वाघोली-अष्टविनायक मार्गावर हे गाव असल्याने या परिसरात मोठी वर्दळ असते. रस्त्यालगत फळांची दुकाने, स्वीट होम, बेकरी, हॉटेल, मोठमोठी किराणा मालाची दुकाने व इतर व्यवसायांची दुकाने आढळून येतात. दररोज निघणारा कचरा जवळपास कुठेतरी टाकला जात असतो. त्यामुळे या परिसरात ओला, सुका व प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

भविष्यात आरोग्याची समस्या
अस्ताव्यस्त पडलेल्या कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट न लावल्यास कालांतराने ही मोठी समस्या होऊन गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Back to top button