पुणेकरांची पाच हजार वाहनांची खरेदी ; 3000 दुचाकी, तर 1343 चारचाकींचा समावेश | पुढारी

पुणेकरांची पाच हजार वाहनांची खरेदी ; 3000 दुचाकी, तर 1343 चारचाकींचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत यंदा पुणेकरांनी 5 हजार 152 वाहनांची खरेदी केली आहे. यात 3 हजार 51 दुचाकी, तर 1 हजार 343 चारचाकींचा समावेश आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 15 ते 22 एप्रिल 2023 या कालावधीतील वाहनांची या वेळी नोंदणी करण्यात आली. त्यानुसार चारचाकी, दुचाकी व्यतिरिक्त 325 गुडस वाहने, 186 रिक्षा, 23 बस, 224 अन्य वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

घर खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
शहरातील दस्तनोंदणी कार्यालयात घर, सदनिका आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. अगदी संध्याकाळपर्यंत कार्यालयात गर्दी असल्याचे दिसून आले. नोंदणी विभागाच्या वतीने शहरातील नागरिकांना मालमत्ता खरेदी अगर विक्री करता यावी यासाठी शहरातील वेगवेगळ्या वेळेला दस्तनोंदणी कार्यालये ठेवण्यात आली होती. आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांनी वाहन नोंदणीचे काम सुरळीत केल्याने पुणेकरांना वेळेत मुहूर्तावर वाहने मिळाली.

Back to top button