नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी तसेच धुळे-मालेगाव मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारपासून (दि.१४) टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी मतदान करुन त्यांचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. टपाली मतदानाची सुविधा मंगळवार (दि.१४) ते गुरुवारपर्यंत (दि.१६) ही सुविधा उपलब्ध असेल.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील टपाली मतपत्रिकेसाठीचे मतदान केंद्र हे दिंडोरी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तयार करण्यात आले आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील टपाली मतदानासाठी नाशिक तहसिल कार्यालय येथे केंद्र कार्यन्वित करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारीस्तरीय सदर मतदान केंद्रावर ज्या अधिकारी/कर्मचारी यांनी टपाली मतदानासाठी फॉर्म नंबर 12-ड भरुन दिलेले आहेत त्यांनाच मतदान करता येईल.
दरम्यान, वरीलप्रमाणे दोन्ही ठिकाणी १७ ते १९ मे या कालावधीत टपाली मतपत्रिका सुविधा केंद्र कार्यन्वित असेल. या केंद्रावर अत्यावश्यक सेवेतील पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ज्यांनी फॉर्म नं. 12 भरुन दिलेले आहेत, त्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा, असे अ्रावाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: