पुणे : उधळपट्टीला पुन्हा वित्तीय समितीचा चाप ; येत्या आर्थिक वर्षासाठी समितीची स्थापना | पुढारी

पुणे : उधळपट्टीला पुन्हा वित्तीय समितीचा चाप ; येत्या आर्थिक वर्षासाठी समितीची स्थापना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेतील अनावश्यक कामांवरील उधळपट्टी रोखण्यासाठी पुढील आर्थिक वर्षांसाठी पुन्हा वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आता या समितीपुढे देखभाल-दुरुस्तीसह/इ स्पीलची /इकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. या समितीमुळे आर्थिक शिस्त कायम राहणार आहे. कोरोना काळात महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घसरल्याने केवळ आवश्यकच कामे व्हावीत यासाठी आयुक्त कुमार यांनी वित्तीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनावश्यक कामांना लगाम बसला होता.

मात्र, या समितीवरून प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात ही समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंततर आता महापालिकेत गेल्या वर्षभरापासून ’प्रशासकराज’ आहे. त्यामुळे सर्व आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासक म्हणून आयुक्तांनाच आहेत. मात्र, महापालिकेत 25 लाखांपेक्षा कमी कामे ही क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी होते. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनावश्यक कामे करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे आयुक्तांनी आर्थिक वर्षभरासाठी पुन्हा वित्तीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गतवर्षात वित्तीय समितीच्या मंजुरीनेच विकासकामे झाली. आता आर्थिक वर्ष संपुष्टात आल्यानंतर या समितीचे अस्तित्व संपले होते. मात्र, आयुक्त कुमार यांनी आता पुढील आर्थिक वर्षासाठी पुन्हा ही समिती स्थापन केली आहे.

Back to top button