पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालामाल | पुढारी

पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालामाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी उत्पन्न मिळवले आहे. सन 2022- 23 वर्षामध्ये पाणीपुरवठा विभागाला तब्बल 149 कोटी 29 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता, खात्याने तब्बल 50 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

ते म्हणाले, मागील आर्थकि वर्षामध्ये ज्या संस्थाकडून थकबाकी वसूल करण्यात आली. त्यामध्ये खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी, गॅरीसन इंजिनिअर्स, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, ससून रुग्णालय, जहांगीर नर्सगिं होम, येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल, जेल प्रेस या प्रमुख शासकीय संस्थांच्या थकबाकीचाही समावेश आहे.

Back to top button