पिंपरी : थकीत मिळकतकर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस | पुढारी

पिंपरी : थकीत मिळकतकर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी गुरुवार (दि.30) आणि शुक्रवार (दि.31) असे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे थकित मिळकतकराचा भरणा करण्यासाठी दोन दिवस रात्री नऊपर्यंत करसंकलन कॅश काउंटर सुरू राहणार आहेत. सुटीच्या दिवशीसुध्दा कॅश काउंटर सुरू राहणार असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाने बुधवारी (दि.29) केले आहे. अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफीची सवलत 31 मार्चपर्यंत असल्याने नागरिकांनी आपला मूळ मिळकतकराचा भरणा विभागीय कार्यालयातील कॅश काउंटरमध्ये जाऊन करावा. तसेच, ऑनलाईन स्वरुपातही बिल भरणा करावा. नागरिकांनी थकित कर भरून दररोज वाढणारे विलंब शुल्क टाळावे. सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

आतापर्यंत 785 कोटींची वसुली
करसंकलन विभागाने आतापर्यंत 785 कोटींची विक्रमी वसुली केली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार कडक कारवाईमुळे 785 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात आला आहे. तरी नागरिकांनी येत्या दोन दिवसांमध्ये थकित कराचा भरणा करावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button