पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी वाढला | पुढारी

पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी वाढला

पुणे : राज्यात बुधवारी 483 कोरोनाबाधित आढळून आले असून, 2506 सक्रिय रुग्ण आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 1.05 टक्क्यांवरून 6.15 टक्के इतका वाढला आहे. सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यां मधील पॉझिटिव्हिटी रेट सध्या सर्वाधिक आहे.

राज्यात दररोज सरासरी 6204 कोरोना चाचण्या होत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत रुग्णालयातील औषधे, साधनसामग्री उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्ह्यांना आणि महापालिकांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करावा, मॉक ड्रिल करावे, लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी, असेही सांगण्यात आले आहे.

राज्यातील उपचार सुविधा
कोविड रुग्णालये – 1589
आयसोलेशन बेड – 51,380
ऑक्सिजन बेड – 49,889
आयसीयू बेड – 14,406
व्हेंटिलेटर – 92352

आजवरचे लसीकरण
पहिला डोस : 9 कोटी 16 लाख 70 हजार 759
दुसरा डोस : 7 कोटी 66 लाख 25 हजार 98
बूस्टर डोस : 96 लाख 56 हजार 664

काय काळजी घ्यावी?
सहव्याधी असणार्‍या व्यक्ती आणि वृध्द यांनी गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे. अशा ठिकाणी सर्वांनी मास्क वापरावा.
शिंकताना आणि खोकताना नाक, तोंड झाकावे.
हातांची स्वच्छता राखावी.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, श्वसनास त्रास होणे, अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना चाचणी करावी.
बूस्टर डोस लसीकरण करून घ्यावे.
सौम्य लक्षणे असली तरी पूर्ण बरे होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या संपर्कात येणे टाळावे.

Back to top button