पिंपरी : वातावरण आणि आजारामुळे हापूसची परीक्षा | पुढारी

पिंपरी : वातावरण आणि आजारामुळे हापूसची परीक्षा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : ढगाळ हवामान, ताप-सर्दी, खोकल्याची साथ अन विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे हापूस आंब्याला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही अपेक्षित मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जणू हापूसची परीक्षा घेतल्याचे चित्र बाजारात होते. पाडवा सनाला पूजा करून आंब्याचा रस आहारात घेतात. मात्र या वेळी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ‘एच 3 एन 2’ सारख्या नव्या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आजारांची लागण होऊ नये, म्हणून नागरिकांनी फळांकडे दुर्लक्ष केले आहे. डझनाला 800 ते 1200 रुपये दर असला तरी एप्रिलमध्ये दर कमी होऊन सामान्यांच्या आवाक्यात येईल. गेल्या वर्षी पाडव्याला पिंपरी बाजारामधून 200 पेटींची विक्री झाली होती, मात्र या वेळी निम्म्याहूनही कमी विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

पिंपरी येथील मार्केट दर मंगळवारी बंद असते. त्या कारणाने ग्राहक बाजारात आलेच नाहीत. त्यामुळे बाजारात हापूसची विक्री कमी झाली, तसेच साथीचे आजार आणि हापूसचे दरही जास्त असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

                                               – मनोज मुलाणी, फळविक्रेते, पिंपरी

बाजारात उपलब्ध आंबा
आंबा : (प्रति डझन)
हापूस (देवगड) ः 600 ते 1100
हापूस (रत्नागिरी) ः 700 त 1200
लालबाग ः200 ते 250
पायरी ः 500 ते 600
बादाम ः 150 ते 200

 

Back to top button