पुणे : ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध ; 1 लाख 19 हजार 813 उमेदवारांचे अर्ज | पुढारी

पुणे : ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध ; 1 लाख 19 हजार 813 उमेदवारांचे अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी 1 लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेवारांना त्यांच्या लॉगइनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील 17 शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र16 मार्चपासून उमेदवारांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत.

तसेच आवश्यक त्या सूचनेसह प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई मेलवरदेखील पाठविण्यात आली आहेत. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी दिली. उमेदवारांनीhttps:// setexam. unipune. ac. या संकेस्थळावर जाऊन लॉगइनमधून नोंदणी क्रमांक टाकून 26 मार्चपूर्वी प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्र या शिवाय विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. 26 मार्चला परीक्षेसाठी सकाळी दहानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे सेट विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button