खोर : दौंड तालुक्यातील रस्त्यांसाठी 27 कोटींचा निधी;आमदार राहुल कुल यांची माहिती | पुढारी

खोर : दौंड तालुक्यातील रस्त्यांसाठी 27 कोटींचा निधी;आमदार राहुल कुल यांची माहिती

खोर; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीसाठी फक्त जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होत होता. ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातही निधी द्यावा, अशी मागणी आमदार कुल यांनी वारंवार विधानसभेत केली होती. त्याला यश आले असून, अर्थसंकल्पात ग्रामीण मार्गासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

1) देऊळगाव राजे ते कदमवस्ती ते धुमाळ फाटा व धुमाळ फाटा ते बोरीबेल दौंड शुगर रस्ता – 2 कोटी. 2) प्रजिमा 98 केडगाव स्टेशन हंडाळवाडी ते पारगाव रस्ता- 2 कोटी. 3) प्रजिमा 79 मलठण हनुमानवाडी ते इजिमा 107 ते रामा 54 रस्ता- 2 कोटी. 4) इजिमा 168 ते सहकारनगर (राहू) रस्ता- 1 कोटी. 5) प्रजिमा 113 वाळकी ते पिंपळगाव हरिजनवस्ती रस्ता- 1 कोटी. 6) कोरेगाव भिवर ते वाळकी रस्ता- 1 कोटी. 7) पारगाव शिरूर ते लिफ्टवस्ती ते पारगाव नानगाव शीव रस्ता- 1 कोटी. 8) यवत ते यादववस्ती रस्ता- 1 कोटी. 9) यवत ते नवलेवस्ती, भरतगाव रस्ता- 1 कोटी. 10) मानकोबावाडी ते राम नऊला यवतजवळ मिळणारा रस्ता- 40 लक्ष. 11) राम 119 ते खुपटेवस्ती रस्ता- 75 लक्ष. 12) हातवळण ते कडेठाण रस्ता ते जगतापवस्ती रस्ता- 50 लक्ष. 13) कडेठाण ते प्राथमिक शाळा ते मळईवस्ती रस्ता- 50 लक्ष. 14) राम 68 ते नाथाचीवाडी रस्ता- 50 लक्ष. 15) राम 68 ते महादेव मंदिर ते तुकाई मंदिर पारगाव रस्ता- 1 कोटी. 16) यवत कुदळेवस्ती ते रामा 119ला मिळणारा रस्ता- 50 लक्ष. 17) प्रजिमा – 29 ते मेमाणेवाडी रस्ता- 50 लक्ष. 18) राहू, नवलेमळा जोडरस्ता- 75 लक्ष. 19) पिलाणवाडी जोडरस्ता ते राम 68 ला मिळणारा रस्ता (राहू-पुणे रस्त्यापर्यंत)- 1 कोटी. 20) पिंगळेवस्ती (भांडगाव) ते प्रजिमा 64 मार्ग रस्ता- 50 लक्ष. 21) वरवंड-बारवकरवस्ती ते प्रजिमा 97 ला जोडणारा रस्ता- 75 लक्ष. 22) प्रजिमा 64 ते विजुळावस्ती खोर रस्ता- 75 लक्ष. 23) खोर फडतरेवस्ती ते लवांडेवस्ती ढोर्जेवस्ती रस्ता- 75 लक्ष. 24) यवत गाडगीळ वस्ती ते ग्रामा 35 जोडणारा रस्ता- 50 लक्ष. 25) दहीटने ते पिलाणवाडी रस्ता- 50 लक्ष. 26) राहू उंडवडी ते वाकणवस्ती ते प्रजिमा 119 रस्ता- 50 लक्ष. 27) मिरवडी राम – 68 ला जोडणारा (राहू-पुणे रस्त्यापर्यंत) रस्ता- 1 कोटी 50 लक्ष. 28) जिरेगाव फाटा ते वासुंदे रस्ता- 1 कोटी. 29) नायगाव ते राजेगाव जुना रस्ता-85 लक्ष. 30) खामगाव ते तांबेवाडी ते यवत स्टेशन रस्ता- 1 कोटी. या रस्त्यांसाठी निधी मिळाला आहे.

Back to top button