इंदापूर तालुक्यात निधी कमी पडू देणार नाही : पाटील | पुढारी

इंदापूर तालुक्यात निधी कमी पडू देणार नाही : पाटील

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोस विकास निधी आणण्यात येत असून, येणार्‍या काळात तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
दगडवाडी-निरवांगी येथील नंदिकेश्वर मंदिराच्या परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, दगडवाडी-निरवांगी येथील नंदिकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, नंदिकेश्वराच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे.

या परिसरातील नागरिकांनी 25 लाख रुपये निधीची मागणी केली असताना आपण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शिखर व सुशोभीकरणाच्या कामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सत्यशील पाटील, ’कर्मयोगी’चे संचालक वसंत मोहोळकर, माजी सभापती प्रदीप पाटील, दगडवाडीच्या सरपंच स्वाती केसकर, उपसरपंच दशरथ पोळ, निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रय पोळ, लक्ष्मीबाई कुदळे, सुशीला रासकर, आप्पासाहेब पारेकर, रामदास रासकर, मनोज निंबाळकर, राजू सूळ, सचिन रासकर आदी उपस्थित होते.

Back to top button