दापोडी : ड्रेनेजलाईन तुंबली; नागरिक दुर्गंधीने त्रस्त | पुढारी

दापोडी : ड्रेनेजलाईन तुंबली; नागरिक दुर्गंधीने त्रस्त

दापोडी : पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर चौक ते सिंहगड कॉलनीदरम्यान ड्रेनेजलाईन खराब झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सुदर्शननगर ते सिंहगड कॉलनी दरम्यान टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन पंधरा ते वीस वर्षे जुनी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार चेंबर तुंबून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. हे टाळण्यासाठी ही ड्रेनेजलाईन नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे.

याबरोबरच स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण पिंपळे गुरवमध्ये सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहेत. परंतु, सिंहगड कॉलनीमधला सिमेंट रस्ता अद्याप झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी ड्रेनेजलाईन टाकून सिमेंटचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणीही अमरसिंह आदियाल यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन आदियाल यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

Back to top button