जेजुरी : श्री खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी | पुढारी

जेजुरी : श्री खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी

जेजुरी(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीगड व कडेपठार गडावरील मंदिरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्त दोन्ही गडांवरील श्री खंडोबा मंदिरात पहाटे विविध रंगांचे पंचामृत तयार करून देवाला रंगांचा अभिषेक घालण्यात आला.

पूजा व आरतीनंतर श्री मार्तंडभैरव, श्री खंडोबा, म्हाळसा व बानुबाई यांच्या मूर्ती व स्वयंभू शिवलिंगाना विविध रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली. मंदिरात रंगपंचमी साजरी झाल्यानंतर नित्य सेवेकरी, मानकरी, पुजारी, सेवक, देवसंस्थानचे कर्मचारी, भाविकांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. मेघमल्हार प्रतिष्ठान व जेजुरीकर भाविकांच्या वतीने रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

Back to top button