मोशी : समाजात वाढती गुन्हेगारी चिंताजनक; निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन | पुढारी

मोशी : समाजात वाढती गुन्हेगारी चिंताजनक; निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन

मोशी; पुढारी वृत्तसेवा : समाजात वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनली आहे. आपल्या मुलांबाबत पालकांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलाला चांगला आहार आणि चांगली संगत गरजेची आहे. ती राहिली तर गुन्हेगारी आटोक्यात येईल, असे मत हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती महोत्सव, समस्त ग्रामस्थ मोशी आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यात शुक्रवारी (दि.24) रोजी इंदोरीकर महाराज यांची कीर्तनसेवा आयोजित केली होती.

सोळा-सतरा वर्षांची पोर गुन्हेगार बनत आहेत. दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी होतात. बलात्कार,विनयभंग होतात, एखादा खून होतो हे वाढत प्रमाण काळजी वाढविणे आहे. यात अल्पवयीन गुन्हेगार अधिक आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या लहान
मनावर बिंबवावे. त्यांनी दिलेले स्वराज्य सुराज्य बनविण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून जात,पात,धर्म वादावर न भांडता आज प्रत्येकाने माणुसकी आणि मानवतेने एकत्र येत देश आणि आपले राज्य समृद्ध केले पाहिजे

आई – वडील यांची सेवा करा
आई-वडील यांची सेवा करा, नोकरीच्या भरवशावर बसू नका. व्यवसाय करा, व्यवसायाची लाज बाळगू नका. तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाण टाळावं, अशा अनेक विषयांवर यावेळी कीर्तन सेवेतून इंदोरीकर महाराज यांनी प्रकाश टाकला. मोशी गावच्या शिवजयंती महोत्सवाचे कौतुक करत त्यांनी गावच्या कार्यक्रम नियोजनाचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

Back to top button