पुणे : मनसेच्या सात पदाधिकाऱ्यांवर राज’कोप’ ; सातजणांची एकाचवेळी केली पक्षातून हकालपट्टी | पुढारी

पुणे : मनसेच्या सात पदाधिकाऱ्यांवर राज'कोप' ; सातजणांची एकाचवेळी केली पक्षातून हकालपट्टी

पुढारी डिजीटल : कसबा पोटनिवडणुकीतील कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याच्या कारणावरून मनसेच्या सात पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्याकडून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.  कॉंग्रेसचा प्रचार करून पक्षाविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी याबाबत पत्र जाहीर केलं आहे.

‘गेल्या काही वर्षांपासून हे लोक पक्षात कार्यरत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.’ असे जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांना पक्षाने नारळ दिला आहे.

भाजपला पाठिंबा पण …

पुण्याच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. मात्र मनसैनिक थेट प्रचारात उतरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण भाजपाला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मनसैनिकांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावेत असंही पक्षाकडून सांगितलं गेलं आहे.

Back to top button