पुणे : जिल्ह्यातील बालकांची होणार तपासणी………. | पुढारी

पुणे : जिल्ह्यातील बालकांची होणार तपासणी..........

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील बारा लाख 25 हजार 83 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जागरूक पालक, सदृढ बालक अभियानांतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची तपासणी सुरू
करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. सध्या आरोग्य तपासणीवर अधिक भर देण्यात येत आहे. ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबवून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सध्या अठरा वर्षांच्या आतील बालकांची तपासणी आणि मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. या दरम्यान शाळा, अंगणवाडी, नर्सरी, खासगी शाळा, आश्रमशाळा, आदिवासी वसतिगृह, दिव्यांग शाळा ठिकाणी आरोग्य विभागाची पथके जाऊन बालकांची तपासणी करणार आहेत.

अभियानाची पूर्वतयारी केली असल्याने त्याची अंमलबजावणी सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये जनजागृतीसह बालकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पालकांनी या अभियानांतर्गत पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी.
                                            – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

 

Back to top button