पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये तळीराम झाडांच्या मुळांवर | पुढारी

पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये तळीराम झाडांच्या मुळांवर

दापोडी : पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथे स्मार्ट सिटीची कामे करण्यात आली आहेत. या वेळी शहराच्या सौंदर्यासाठी पदपथावर लावलेली झाडे वाढीसाठी दम तोडत आहेत. परिसरातील तळीराम मद्यपान करून झाडांच्या मुळांवर आले असून, ते झाडांची नासधूस करताना दिसत आहेत.

सौंदर्यकरणासाठीचा खर्च गेला वाया
महाराष्ट्रभर झाडे लावा, झाडे जगवाचा नारा दिला जातो. महापालिकेच्या वतीने यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून स्थानिक रहिवाशांना सेवासुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रशस्त रस्ते, पदपथ, वीज, पाणीपुरवठा पाइपलाइन, चौकांच्या सौंदर्यात भर आदी कामे करण्यात येत आहेत. झाडे लावली मात्र त्यांना सांभाळणार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, पदपथावर लावलेली झाडे वाढीसाठी दम तोडत आहेत.

दारूच्या बाटल्यांचा खच
पिंपळे गुरव येथील एमएस काटे चौक ते त्रिमूर्ती चौक या रस्त्यावर तळीरामांचा रात्रीच्या वेळी खेळ सुरू होतो. लाईन शापमधून साहित्य खरेदी करून दोघे चौघे एकत्र मिळून बस्तान मांडतात. कोणाचीही तमा न बाळगता ते बिनधास्तपणे मद्यपान सुरू करतात. प्रशासनाकडून पदपथावर लागवड केलेल्या झाडांना बळकटी मिळण्यासाठी खत व पाणी घातले जाते. वाढलेले गवत काढून खुरपणी केली जाते. यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. झाडांना पालवी फुटली की तळीराम आडोसा घेऊन बस्तान मांडतात. मद्यपान करून झाल्यावर त्याच ठिकाणी प्लास्टिक बाटली, कचरा टाकला जातो. आपल्या धुंदीत तळीराम झाडांची तुडवणूक करून टाकतात.
संबंधित तळीरामांवर कठोर कारवाई करावी की, पुन्हा त्यांची रस्त्यावर बसण्याची हिंमत होणार नाही. यासाठी पर्यावरण व पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Back to top button