शिवाजीनगर स्थानकावरून आणखी एका लोकलसेवेत वाढ | पुढारी

शिवाजीनगर स्थानकावरून आणखी एका लोकलसेवेत वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर टर्मिनलवरून आणखी एक लोकल सेवा वाढवली आहे. सध्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून तळेगाव ते लोणावळ्यापर्यंत लोकलच्या चार गाड्या धावत आहेत. त्यामध्ये आणखी एका लोकलची वाढ करण्यात आली असून, ही गाडी 20 फेब्रुवारीपासून पुणे स्थानकावरून शिवाजीनगरला हलवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर स्थानकावरून आता आणखी लोकल गाड्या सेवा पुरवतील. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Back to top button