पुणे : व्याज उकळणार्‍या सावकाराला अटक | पुढारी

पुणे : व्याज उकळणार्‍या सावकाराला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहा टक्के दराने व्याज उकळणार्‍या सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. कैलास तुकाराम कडू (वय 35, रा. साईनगर, हिंगणे खुर्द) असे या सावकाराचे नाव आहे. याबाबत कोंढवे धावडे येथील एका 28 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या चुलतभावाला व्याजाने पैसे दिले होते. त्यासाठी त्याने कोरे चेक व त्यांच्या दुचाकी तारण ठेवून घेतल्या होत्या.

पैसे दहा टक्के व्याजाने देताना त्याने प्रोसेसिंग फी कट करून घेतली. आरोपी सावकार फिर्यादींना व्याज व दंड देण्याची मागणी करत होता. तसेच त्यांच्या चुलतभावाच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करत पैशाची मागणी करत होता. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

Back to top button