पिंपरी : फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा ; दुपारी उन्हाने लाही लाही | पुढारी

पिंपरी : फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा ; दुपारी उन्हाने लाही लाही

पिंपरी : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी पळाली असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी उन्हात फिरणार्‍यांची आतापासूनच लाही लाही होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे सोमवारचे (दि. 13) कमाल तापमान 34 अंशापर्यंत गेले होते.
सकाळी आणि रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक सकाळीच कामे उरकून घेत आहेत.

तसेच, उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, टोपी, स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमान हे 33 ते 36 अंशापर्यंत वाढलेले आहे. शहरात उन्हामुळे साच्या रसाची गुर्हाळे लवकर सुरू झाली आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गुर्‍हाळांची संख्या कमी प्रमाणात होती. यावर्षी मात्र, मोठ्या प्रमाणात गुर्‍हाळे सुरु झाली आहेत. याबरोबरच शहरात ठीकठिकज्ञाणी फळांच्या रसाची दुकाने थाटलेली दिश्रसत आहेत.

Back to top button