पुणे : अभिजित बिचुकले यांना जिवे मारण्याची धमकी | पुढारी

पुणे : अभिजित बिचुकले यांना जिवे मारण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे बिचुकले यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार बिचुकले यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली आहे. ‘अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा,’ अशा धमक्या आपल्याला येत असल्याचा दावा बिचुकले यांनी केला आहे. फोनवरून या धमक्या आल्यानंतर बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकार्‍यांना पत्र लिहून तक्रार केली आहे तसेच तातडीने संरक्षण देण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकार्‍यांना देण्याची
मागणीही केली आहे.

 

Back to top button