महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याला मान्यता; चाकण पोलिस ठाण्याचे विभाजन | पुढारी

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याला मान्यता; चाकण पोलिस ठाण्याचे विभाजन

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक भागासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याला अखेर गृह विभागाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महाळुंगे पोलिस चौकी आता महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे होणार आहे. चाकण पोलिस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलिस चौकीची निर्मिती चार वर्षांपूर्वी (जुलै 2019) करण्यात आली होती. आता या चौकीला पोलिस ठाण्याची मान्यता मिळाली आहे. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईट चौकीच्या अंतर्गत असलेली सर्व गावे नवीन महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात 48 गावांचा समावेश असून, उर्वरित केवळ 23 गावे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार आहेत.

चाकणमधील औद्योगिकीरणामुळे चाकण-महाळुंगे परिसर संवेदनशील झाला आहे. यादृष्टीने एमआयडीसी भागात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, असे मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. चाकण एमआयडीसीसाठीच्या महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा नवीन प्रस्ताव पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पोलिस ठाण्यांच्या भौगोलिक सीमाबदलाची अभ्यास प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, चार वर्षांपूर्वी डीजी कार्यालय स्तरावरून केवळ महाळुंगेसाठी नवीन चौकीला मान्यता देण्यात

आली होती. तेव्हापासून चाकण पोलिस ठाण्याच्या अंकित महाळुंगे चौकी कार्यान्वित होती. आता एमआयडीसी भागासाठी नवीन पोलिस ठाणे अस्तित्वात येणार आहे. चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गावे पुढीलप्रमाणे : चाकण पोलिस ठाणे हद्दीतील गावे : चाकण, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलगाव, पिंपळगावतर्फे खेड, मोहितेवाडी, सिद्धेगव्हाण, दौंडकरवाडी, रोहकल, पिंपरी खुर्द, गोनवडी, बिरदवडी, नाणेकरवाडी, चिंचोशी, साबळेवाडी, बहुळ, काळूस, वाकी बुद्रुक, संतोषनगर (भाम), वाकी खुर्द आणि कुरुळी (पुणे-नशिक महामार्गाच्या पूर्वेकडील बाजू).

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील गावे : महाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, बोरदरा, भांबोली, वराळे, वासुली, कोरेगाव खुर्द, शिंदे, सावरदरी, खालुम्ब—े, सांगुर्डी, येलवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, मोई, निघोजे, कुरुळी (पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजू), कुरकुंडी, तळवडे, आसखेड बुद्रुक, आसखेड खुर्द, शेलू, करंजविहिरे, धामणे, पाईट, कोये, वाकीतर्फे वाडा, वाहागाव, देशमुखवाडी, वाघू, कोळीये, कान्हेवाडी खुर्द, पराळे, कोहिंडे खुर्द, गडद, वेल्हावळे, रौंधळवाडी, आखतुली, आडगाव, पाळू, अनावळे, कासारी, टेकवडी, हेदृज, तोरणे बुद्रुक आणि अहिरे.

Back to top button