पुणे : रेमडिसिव्हीर, अँटिजेनचा साठा शिल्लक | पुढारी

पुणे : रेमडिसिव्हीर, अँटिजेनचा साठा शिल्लक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयाकडे कोरोना काळातील औषधे, इंजेक्शन आणि साधनसामग्रीचा कोट्यवधी रुपयांचा साठा शिल्लक आहे. त्यापैकी काही औषधांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनातर्फे शासनाला पत्र पाठविले आहे. शिल्लक साठा गरज भासल्यास शासकीय रुग्णालयांना देता येऊ शकतो. जिल्हा रुग्णालयातील शिल्लक साठ्यामध्ये रेमडिसिव्हीर, रॅपिड अँटिजेन किट, रक्त पातळ होण्याच्या हिपॅरिनच्या गोळ्या, म्युकरमायकोसिससाठी लागणारे अ‍ॅम्फोटोरेसिन व पीपीई किटचा समावेश आहे.

मुदतबाह्य सामग्रीचे प्रमाण 50 हजारपर्यंत असल्यास त्याची विल्हेवाट लावण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त साठ्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो. काही औषधे दोन महिन्यांत मुदतबाह्य होतील, तर काही औषधांची मुदत पुढील वर्षी संपत आहे. कोरोना काळातील शिल्लक औषधे गरजेप्रमाणे शासकीय रुग्णालयांना मोफत देण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये यांना पत्र पाठविले आहे.

                                    शिल्लक साठा
औषध                            शिल्लक साठा                   एक्सपायरी
रेमडिसिव्हीर               1 लाख 12 हजार 222              एप्रिल 2023
रॅपिड अँटिजेन किट      1 लाख 5 हजार                     फेब्रुवारी 2024
हिपॅरिन गोळ्या                 40 हजार                          जुलै 2023
व्हीटीएम किट            1 लाख 60 हजार                    ऑगस्ट 2023
अ‍ॅम्फोटेरेसिन                  10 हजार                           मे 2023
पीपीई किट                     28 हजार                  एप्रिल/नोव्हेंबर 2023

Back to top button