तळेगाव स्टेशन: रेल्वेच्या धडकेने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू | पुढारी

तळेगाव स्टेशन: रेल्वेच्या धडकेने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

तळेगाव स्टेशन: येथे बुधवारी (दि.१८) मध्यरात्री धावत्या रेल्वेची धडक लागून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचे वय अंदाजे ३५ वर्ष आहे. रंग गोरा असुन केस काळे आहेत. उंची अंदाजे ५ फुट ५ इंच आहे. त्याच्या अंगात काळ्या रंगाचे जर्किंग आणि आकाशी रंगाचा रेषा रेषाचा टी शर्ट आहे. त्याने काळ्या रंगाची पँट घातलेली आहे, असे मयताचे वर्णन आहे. ही माहिती तळेगाव लोहमार्ग पोलिस मदत केंद्र येथील पोलिस अंमलदार प्रशांत संपत जाधव यांनी दिली. या संदर्भात कोणास काही माहिती मिळाल्यास तळेगाव स्टेशन रेल्वे पोलीस येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button