पुणे : खाद्यतेलामंधील घसरण सुरूच, तुरडाळही उतरली, शेंगदाणा महागला | पुढारी

पुणे : खाद्यतेलामंधील घसरण सुरूच, तुरडाळही उतरली, शेंगदाणा महागला

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सोयाबीन, पामोलिन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात 15 किलोमागे आणखी 40 ते 50 रुपयांनी घसरण झाली. आवक वाढल्यामुळे तुरडाळीचे दर 500 रुपयांनी उतरले. हुलग्याच्या दरातही मोठी घसरण झाली. आवक कमी असल्यामुळे शेंगदाण्याचे दर क्विंटलमागे पाचशे रुपयांनी वाढले. सध्या जागतिक बाजारात पामोलिन, सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील घसरण कायम आहे. स्थानिक बाजारातही मागणी कमी असून आवक आवक मुबलक प्रमाणात होत असल्याने दरातील घसरण सुरुच आहे. गेल्या आठवडयातही सोयाबीन, पामोलिन आणि सुर्यफूल तेलाच्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 40 ते 50 रुपयांनी घट झाली.

आवक वाढल्यामुळे तुरडाळ, हुलग्याचे दर घसरले
नव्या तुरीची आवक वाढत असल्यामुळे गेल्या आठवडयात तुरडाळीची दरवाढ थांबून हलक्या प्रतीच्या तुरडाळीचे दर क्विंटलमागे 500 रुपयांनी उतरले. मात्र, भारी प्रतीच्या तुरडाळीचा तुटवडा कायम असल्यामुळे दरवाढ कायम होती. कर्नाटकातील म्हैसुर भागातून नव्या हुलग्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून दरात मोठया क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांनी घसरण झाली. येत्या काही दिवसात दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते.

चिक्की गुळाची मागणी संपली
आवक मुबलक असून मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवडयातही साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3 हजार 450 ते 3 हजार 500 रुपये होता. संक्रातीच्या सणामुळे आठवडयातही चिक्की गुळास मागणी चांगली होती. रविवारी संक्रातीचा सण झाल्यामुळे यापुढे या गुळाची मागणी आता संपली आहे. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्य गुळाचे दरही तेजीतच होते. पुढील आठवडयात मागणी कमी राहून दरात काही प्रमाणात घट अपेक्षित आहे.

शेंगदाणा महागला
गुजरातमध्ये आवक कमी असल्यामुळे जाडा शेंगदाण्याचे दर कडाडले आहेत. येथील घाऊक बाजारात आवक कमी प्रमाणात होत असून मागणी चांगली असल्यामुळे जाडा शेंगदाण्याचे दर क्विंटलमागे 500 रुपयांनी तर टीजे आणि घुंगरु शेंगदाण्याचे दर क्विंटलमागे तीनशे रुपयांनी वाढ झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे साबुदाणा, मिरची, पोहे, बेसन, रवा, मैदा आणि आटा तसेच नारळाचे दर स्थिर होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3450-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2620-2720, रिफाईंड तेलः 2475-3250, सरकी तेल 1800-2200, सोयाबीन तेल 1900-2100, पामतेल 1400-1700, सूर्यफूल रिफाईंड तेल 1900-2080, वनस्पती तूप 1400-1900, खोबरेल तेल 2350 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3900-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन 3250-3600, सिहोर नं. 1 5000-5600, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3600-4000,
मिलबर 3100 रु. ज्वारी : गावरान नं. 1-5200-5400, गावरान नं. 2-4500-4800, नं. 3 4000-4400, दूरी 3700- 3900 रु. बाजरी : महिको 3300-3500, गावरान 3000-3200, हायब्रीड 2800-2900 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 3800-4100, गूळ नं. 1 3450-3650, गूळ नं. 2 3200-3350, गूळ नं.3 3000-3150, गूळ नं. 4 2850-2950, बॉक्स पॅकिंग 3300-4700 रु.डाळी :- तूरडाळ 9500-11000, हरभराडाळ 5900-6000, मूगडाळ 8500-9600, मसूरडाळ 7600- 7700, मटकीडाळ 9500-9600, उडीदडाळ 8000-10000 रु.

कडधान्ये :- हरभरा 5400-5500, हुलगा- 6000 चवळी 7500-8500, मसूर 6800-7000, मूग 8000-8500, मटकी गावरान 11500-12500, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 7500- 7700, मटकी राजस्थान 7500-8000, मटकी सेलम 14000-14500, वाटाणा हिरवा 5800-6000,

वाटाणा पांढरा : 6500-6600, काबुली चणा 12000-15000 रु. साबुदाणा :- साबुदाणा नं.1 6000, साबुदाणा नं.2 5700, साबुदाणा नं.3 5500 रु. वरई भगर :-11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1300-1600 रु. शेंगदाणा :- जाडा 11200-12200, स्पॅनिश – 12000, घुंगरु 11000-15000, टीजे 9700 रु. धने :- गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल : 2675-2725, पिवळा 2650-2700, पांढरा 3000-3200 रु. पोहे : मध्य प्रदेश 3800-4200, पेण 3800-3900, मध्यम पोहा-3500-4100, दगडी पोहा 3600- 4200, पातळ पोहा 4200-5000, सुपर पोहा 4200-4500, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु.

रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1650-1750, रवा 1725-1775, मैदा 1750-1800 बेसन : (50 किलोस) 3350-3550 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रु.

Back to top button