भाजप आमदार जयकुमार गोरे पुन्हा रुगालयात दाखल | पुढारी

भाजप आमदार जयकुमार गोरे पुन्हा रुगालयात दाखल

पुणे, पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांची गेल्या दोन दिवसात प्रवासाने शरीराची हालचाल वाढल्याने आणि हवी तशी विश्रांती मिळाली नसल्यामुळे त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी रात्री रूबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा पुण्यात आणण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला आणि छातीच्या बरगड्याना चांगलीच इजा झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आमदार गोरेंना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र त्यांच्या शरीराच्या हालचाली वाढल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button