अखेर मोशी ते पुणे मनपा पीएमपीएल बससेवा सुरू | पुढारी

अखेर मोशी ते पुणे मनपा पीएमपीएल बससेवा सुरू

मोशी : पुढारी वृत्तसेवा :  मोशीमधून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलने थेट बस सेवा पूर्ववत सुरू करावी, यासाठी दैनिक पुढारीने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ग्रामस्थांनी देखील याबाबत प्रशासनास निवेदन दिली होती.  या निवेदनाचा सकारात्मक विचार करून शनिवारपासून मोशी ते मनपा भवन, अशी बससेवा सुरू करण्यात आली.

येथील स्थानिक नागरिक संतोष बोराटे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून मोशी ते मनपा भवन हा मार्ग सुरू करवून घेतला. या बस सोबतच बसचे चालक वसीम बेग व वाहक राहुल गाढवे यांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे, गणेश सस्ते, रोहीदास हवालदार, राजेश सस्ते, गणेश गायकवाड उपस्थित होते.

Back to top button