पुणे : केंद्रीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | पुढारी

पुणे : केंद्रीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठीच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारी आणि एप्रिलमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स), वैद्यकीय प्रवेशांसाठीची नीट परीक्षा 7 मे रोजी, विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) 21 ते 23 मे रोजी होणार आहे.
’एनटीए’ने नोंदणीची आणि परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

’एनटीए’तर्फे विविध प्रवेश परीक्षांची प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबवली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाजावरही झाला होता. ’एनटीए’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक आता पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.

जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची परीक्षा 24, 25, 27, 28, 29 आणि 30 जानेवारीला; तर दुसर्‍या सत्राची परीक्षा 6. 8, 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी होईल. राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) 7 मे रोजी, तर विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) 21 ते 23 मे रोजी होणार आहे. ’एनटीए’ने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी तयारी अधिक कसून करावी लागणार आहे.

‘जेईई मेन्स’ जानेवारी आणि एप्रिलमध्ये, ‘नीट’सह ‘सीयूईटी’ मे महिन्यात प्रवेश परीक्षांची प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबवली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाजावरही झाला होता. ’एनटीए’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक आता पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.

जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची परीक्षा 24, 25, 27, 28, 29 आणि 30 जानेवारीला; तर दुसर्‍या सत्राची परीक्षा 6. 8, 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी होईल. राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) 7 मे रोजी, तर विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) 21 ते 23 मे रोजी होणार आहे. ’एनटीए’ने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी तयारी अधिक कसून करावी लागणार आहे.

जेईई मेन्सची नोंदणी सुरू…
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ’एनटीए’कडून जेईई मेन्स या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 12 जानेवारी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. एकूण तेरा भारतीय भाषांमध्ये आणि ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल.

Back to top button