बारामती : कालव्यात आढळला पुरुषाचा मृतदेह | पुढारी

बारामती : कालव्यात आढळला पुरुषाचा मृतदेह

बारामती : वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सस्तेवाडी (ता. बारामती) येथे निरा डावा कालव्याच्या पाण्यात अंदाजे 45 ते 50 वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शनिवारी (दि. 10) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना कालव्याच्या पाण्यात एका ठिकाणी हा मृतदेह अडकल्याचे दिसून आले.

पोलिसांना खबर दिल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिस ठाण्याशी (02112/272133) क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.

Back to top button