दै. पुढारी आयोजित ‘राईज अप’ : आजपासून रंगणार टेबल टेनिस स्पर्धा | पुढारी

दै. पुढारी आयोजित ‘राईज अप’ : आजपासून रंगणार टेबल टेनिस स्पर्धा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी आयोजित राईज अप महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेला महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही स्पर्धा शनिवारी (दि. 10) पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू होत असून, रविवारपर्यंत (दि. 11) दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 11 वर्षांखालील, 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील, वेटर्न्स महिला आणि महिलांच्या एकेरी, अशा गटामध्ये या स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 11) सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकर यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने पार पडणार आहे.

Back to top button