पिंपरी : अडीच हजारांपेक्षा अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण | पुढारी

पिंपरी : अडीच हजारांपेक्षा अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गोवरचे बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आत्तापर्यंत 2 हजार 538 बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. तर, 20 हजार 562 बालकांना ’व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आली आहे.
शहरामध्ये कुदळवाडी भागात गोवरचे बाधित रुग्ण आढळले होते.

8 संशयित रुग्णांपैकी 5 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाकडून गोवर लसीकरण आणि पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत 5 वर्षांखालील 36 हजार 435 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून आजअखेर गोवरचे एकूण 339 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी गेल्या 11 महिन्यांत 8 जणांना गोवरची लागण झाली आहे.

Back to top button