पुणे : दुचाकींच्या बॅटर्‍या चोरणारी अल्पवयीन मुले ताब्यात | पुढारी

पुणे : दुचाकींच्या बॅटर्‍या चोरणारी अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दुचाकींच्या बॅटर्‍या चोरणार्‍या अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन बॅटर्‍या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ, कात्रज परिसरात दुचाकींच्या बॅटर्‍या चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी दोन अल्पवयीन मुले आंबेगाव येथील गायमुख परिसरात थांबली असून, ते दुचाकीस्वारांना बॅटरीची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

चौकशीत मुलांनी दुचाकीच्या बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली. आंबेगाव, धनकवडी भागातून अल्पवयीन मुलांनी बॅटर्‍या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलांकडून दुचाकी तसेच तीन बॅटर्‍या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अमर भोसले, शैलेश साठे, रवींद्र चिप्पा, विश्वनाथ घोणे, राहुल तांबे, विजय सावंत आदींनी ही कामगिरी केली.

Back to top button