पुणे : कोश्यारी यांना पदमुक्त करा : विकास पासलकर यांची मागणी | पुढारी

पुणे : कोश्यारी यांना पदमुक्त करा : विकास पासलकर यांची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्यांनी या राज्याची प्रतिमा मलीन केली असून राज्यपाल पदाची गरिमा घालवली आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल या पदावरुन मुक्त करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले आहे.

पासलकर म्हणाले, राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सदर्भात जी विधाने केली आहे तसेच सातत्याने शिवरायांच्या संदर्भात चुकीचे विधाने करून महाराष्ट्राचादेखील त्यांनी अवमान केला आहे. उदयनराजे भोसले महाराज यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत आहोत. अखिल भारतीय शिव महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती उदयनराजे व छत्रपती संभाजी राजे या दोन्ही राज घराण्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत आहोत.

हरियाना कमलजीत महाले, सत्येंद्र दाभाडे, गुजरात प्रदीपराजे शिर्के, सतीश धुमाळ, दिल्ली प्रदीप पाटील, कमलेश पाटील, कर्नाटक अशोक महानोर, श्यामसुंदर गाईकवाड, शंकरराव चव्हाण, राजस्थान रमेशसिंह मोहब्बतसिंग भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तसेच पुणे व महाराष्ट्रातील सगळे शिवभक्त, शिवरायांचे मावळे छत्रपती घराण्यासोबत असल्याचे पासलकर यांनी सांगितले. प्रशांत धुमाळ, विराज तावरे, मयुर शिरोळे, राहुल शिरोळे, मंदार बहिरट, मोहन घारे यांसह मान्यवर ,ख।०उपस्थित होते.

Back to top button