डोंगरगाव येथील हातभट्टी उद्ध्वस्त | पुढारी

डोंगरगाव येथील हातभट्टी उद्ध्वस्त

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्यावर छापासत्र सुरू केले असून, वेहेरगावनंतर आता डोंगरगाव येथील एका गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकत तब्बल 80 हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट केले. लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी विभागातील सर्व अवैध धंदे पूर्णतः बंद करण्याचे स्पष्ट केले होते. यानंतर आता धडाका सुरू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. लोणावळा व मावळ तालुक्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्यांनी थेट कार्तिक यांच्याशी अथवा आपल्या परिसरातील पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोंगरगाव येथील कंजारभट वस्तीजवळ झाडाझुडपात सूर्यदेव अशी राठोड (रा . डोंगरगाव, ता. मावळ) हा गावठी हातभट्टीची दारू बनवत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार हे तपास
करत आहेत.

Back to top button