पाटस : कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होईना | पुढारी

पाटस : कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होईना

पाटस; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांनी वखारीत साठवणूक केलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शेतात पाणी साठल्याने नवीन आलेले कांदा पीक नष्ट झाले आहे. एकीकडे कांद्याची बाजारपेठेत मागणी वाढली असली तरी, दुसरीकडे चांगला कांदा उपलब्ध होत नसल्याने भावात वाढ झाली आहे. परंतु, वाढलेल्या भावाचा शेतकर्‍यांना फारसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.

दौंड तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी चांगला भाव मिळेल, या आशेवर कांद्याची वखारीत साठवणूक केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांदा सडला असून, वखारीतून शेतकर्‍यांना फक्त 30 ते 35 टक्के चांगला कांदा मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होणे अवघड झाले आहे. सध्या बाजारात कांद्याला मागणी वाढली आहे. कांद्याच्या आकाराप्रमाणे 10 ते 35 रुपये भाव मिळत आहे. मात्र, शेतकर्‍यांजवळ शिल्लक कांदा कमी प्रमाणात असल्याने वाढलेल्या भावाचा फायदा होत नसल्याचे दिसत आहे.

 

 

 

 

Back to top button