शिवगंगा खोर्‍यातील युवकाकडून कब्रू डोम शिखर सर | पुढारी

शिवगंगा खोर्‍यातील युवकाकडून कब्रू डोम शिखर सर

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: शिवापूर येथील युवक तुषार दत्तात्रय दिघे याची दार्जीलिंग येथे गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी मागील महिन्यात निवड झाली होती. त्यामध्ये त्याने हिमालयातील कब्रू डोम या 17,500 फूट उंच शिखरावर तिरंगा फडकविला. शिवगंगा खोर्‍यातील असे करणारा तो पहिलाच गिर्यारोहक ठरला आहे. तुषार हा सप्टेंबरच्या शेवटी 30 दिवस या प्रशिक्षणासाठी दार्जीलिंग येथे इंडियन हिमालयास इन्स्टिट्यूट या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेला होता.

सिक्कीम येथील कब्रू डोम शिखर कॅम्प 1, हा 17500 फूट म्हणजेच 5833 मीटर एवढ्या उंच शिखरावर यशस्वीरीत्या चढाई करून तिरंगा फडकवला. तत्पूर्वी राज्यातील व राज्याबाहेरील सुमारे शंभर गडकिल्ले, तीस सुळक्यांवर यशस्वी चढाई करून अनेक पुरस्कार मिळविले आहेत. यापूर्वी हिमालयात तीन वेळा वेगवेगळी शिखरे सर करून तिरंगा फडकविला आहे. तुषारने सह्याद्री रांगेतील अतिविशाल तैलबैल सुळक्यावर सुमारे अडीच हजार फूट उंच मधोमध झोका बांधून रात्रभर मुक्काम केला होता. कब्रू डोम शिखर सर केल्याबद्दल शिवगंगा खोरे परिसरातून सर्व पक्षीयांसह सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

 

Back to top button