पुणे : यंदा राज्यात कडाक्याची थंडी; किमान तापमानात मोठी घट होणार | पुढारी

पुणे : यंदा राज्यात कडाक्याची थंडी; किमान तापमानात मोठी घट होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रशांत महासागरासह हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान थंड झाले आहे. त्याचा परिणाम देशभरातील थंडीवर होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब—ुवारीदरम्यान संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने शनिवारी दिले. देशात यंदा मान्सूनचा मुक्काम सुमारे एक महिन्याने वाढल्याने अंतिम टप्प्यात अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे थंडीचा हंगामही वाढून कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना व्यक्त केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर ते फेब—ुवारी या हिवाळ्याच्या कालावधीत थंडीची तीव—ता वाढणार आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही अशीच स्थिती सध्याच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागर व हिंदी महासागराच्या परिस्थितीवर अवलंबून असते. सध्या या दोन्ही महासागरांतील पृष्ठभागाचे तापमान थंड होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचे संकेत दिले आहेत. अशीच स्थिती बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातदेखील दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील, असे संकेत आहेत.

‘ला-निना’ कमकुवत असल्याने थंडी वाढणार
प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ परिस्थितीमुळे या हंगामात हिवाळा अधिक थंड होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. ‘ला-निना’ची स्थिती कमकुवत असल्याने यावर्षी अधिक थंडी पडण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. ‘ला-निना’ची परिस्थिती शीतलहरींसाठी अनुकूल आहे, तर ‘एल-निनो’ची परिस्थिती प्रतिकूल आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. गेल्यावर्षी थंडीच्या मोसमात थंडीच्या लाटा लांबल्या होत्या.

एल निनोे व ला-निनो म्हणजे काय..
प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या उष्ण प्रवाहाला एल निनो स्थिती म्हणतात. त्याची तीव—ता वाढली की उष्ण पाण्याचा प्रवाह सक्रिय झाला की त्याचा फटका मान्सूलला बसतो. त्यावर्षी भारतीय उपखंडात कमी पाऊस पडतो, तर प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाहाला ला-निनो स्थिती म्हणतात. एल-निनोचा प्रभाव कमी होत जाऊन पाणी थंड होऊ लागते. त्यावेळी पाऊस चांगला पडतोच, पुढे थंडीही चांगली पडते.

हिमालयातून येणार शीतलहरी
हिमालयाच्या पायथ्याशी पुढील दोन दिवसांत पश्चिमी चक्रवात पाकिस्तानमार्गे धडकणार आहे. याची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने उत्तर भारतासह राज्यात थंडी वाढणार आहे, असे पश्चिमी चक्रवात थंडीच्या कालावधीत वारंवार धडकणार आहेत. येथून शीतलहरी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील तापमान
राज्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत विविध शहरांत नोंदलेले किमान तापमान असे – पुणे – 13.3, नगर – 14.8, जळगाव – 14.6, कोल्हापूर – 17.5, महाबळेश्वर – 13.2, नाशिक – 13.6, सांगली – 17.1, सातारा – 15.2, सोलापूर – 16.6, मुंबई – 23.5, रत्नागिरी – 21.3, डहाणू – 20, अकोला – 18.2, अमरावती – 15.9, बुलडाणा – 16.6, ब—ह्मपुरी – 17.6, चंद्रपूर – 17.4, गोंदिया – 16.8, नागपूर – 16.6, यवतमाळ – 16.4.

Back to top button