पिंपरी : गोमांस विक्रीप्रकरणी एकास अटक | पुढारी

पिंपरी : गोमांस विक्रीप्रकरणी एकास अटक

पिंपरी : गोमांस विक्रीप्रकरणी पोलिसांनी एकास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 15) पुणे- मुंबई महामार्गावर ओझर्डे गाव येथे घडला. याप्रकरणी आशिष कमलाकांत बारीक (25, रा. घाटकोपर) यांनी शिरगाव परंदवडी पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालक मेहबूब शमशोद्दीन मैदरगीकर (45, रा. रमाबाईनगर, रावेत) यास अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा टेम्पोचालक आहे. शनिवारी आरोपी त्याच्या टेम्पोतून दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे गोमांस घेऊन जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे गोमांस तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button