पुणे: पीएमपीच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश बकोरिया | पुढारी

पुणे: पीएमपीच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश बकोरिया

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्ष्मीनारायण मिश्रा यांची केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय्य सहाय्यकपदी नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. गेले काही दिवसांपासून लक्ष्मीनारायण मिश्रा दिल्लीकडे गेल्याची चर्चा होती. त्यांची जागा महिना दीड महिन्यापासून रिकामी होती.

मिश्रा यांच्या जाण्यामुळे पीएमपीत अंतर्गत राजकारणाचा डोंब उसळला होता. आता बकोरिया यांनी पदभार स्विकारल्यावर काही प्रमाणात का होईना आळा बसून पीएमपीची कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुधारेल, अशी पीएमपी कर्मचार्‍यांकडून आशा व्यक्त केली जात आहे. ओमप्रकाश बकोरिया यांनी क्रीडाआयुक्त म्हणून पुण्यात यापुर्वी काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील वाहतूक आणि पीएमपी यांची चांगलीच माहिती आहे. परिणामी, पीएमपीला येणार्‍या समस्या तात्काळ सुटतील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button