वासुंदे येथील रस्ता तलावाच्या पाण्यात; विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीव मुठीत धरून प्रवास | पुढारी

वासुंदे येथील रस्ता तलावाच्या पाण्यात; विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीव मुठीत धरून प्रवास

पाटस; पुढारी वृत्तसेवा: वासुंदे परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाजबे- खोमणे वस्तीकडे जाणारा रस्ता तलावाच्या पाण्यात गेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वासुंदे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील सर्वच तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. परिणामी तलावाखालील बंधारे, ओढे- नालेही काठोकाठ भरले आहेत.

मात्र, येथील जगताप तलावातील पाण्याने हाजबे- खोमणे वस्तीकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता आपल्या कवेत घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांचीच मोठी अडचण झाली आहे. शेतकरी व वयोवृद्ध नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता संबंधित शासकीय यंत्रणेने वाहतुकीसाठी खुला होण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यास याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या अडचणी शासकीय यंत्रणेने ताबडतोब सोडवाव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकरी व पालकांनी केली आहे.

Back to top button