चाकण : अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचे खून | पुढारी

चाकण : अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचे खून

चाकण; पुढारी वृत्तसेवा: अनैतिक संबंधांच्या संशयातून दोन तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी ( ता. खेड ) येथे घडली आहे. सुरज चव्हाण आणि अनिकेत पवार ( दोघेही सध्या रा. सावरदरी, ता. खेड ) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी (दि. ८) रात्री हि घटना घडली असून महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

घरगुती मेस मध्ये जेवणासाठी येणाऱ्या तरुणांनी काही गैरकृत्य केल्याच्या संशयातून चाकूने पोटात सपासप वार करून हे खून करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महाळुंगे पोलिसांनी सावरदरी येथून काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून झालेल्या तरुणांचे मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. दरम्यान गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महाळुंगे पोलिसांत सुरु असल्याचे महाळुंगे पोलीस चौकीचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी सागितले.

Back to top button