पुणे : वेश्या व्यवसायातील चार तरुणींची सुटका; स्पाचालक मॅनेजरसह दोघांना अटक | पुढारी

पुणे : वेश्या व्यवसायातील चार तरुणींची सुटका; स्पाचालक मॅनेजरसह दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी स्पाचालकासह मॅनेजरला ताब्यात घेऊन चार पीडित परदेशी महिलांची सुटका करण्यात आली.
स्पा मॅनेजर अमिर अब्दुसुबन हुसेन (वय 22, रा. येरवडा), नवाज लालुमिया उद्दीन (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या इतर चार साथीदारांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अजय नारायण राणे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला कोरेगाव पार्कमधील अवयान स्पा ज्वेल स्क्वेअर इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील एका शॉपमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली.

 

Back to top button