पिंपरी : जादा नफ्याच्या आमिषाने तेरा लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : जादा नफ्याच्या आमिषाने तेरा लाखांची फसवणूक

पिंपरी : जादा नफ्याचे आमिष दाखवून एकाची तेरा लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी परिसरात घडला. बबन चंदर खोडवे (64, रा. संभाजीनगर चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 30) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, रवी गवळी (रा. चिंचपोकळी, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फिर्यादी खोडवे यांच्या सोसायटीत राहणार्‍या बजरंग कांगणे यांच्या ओळखीचा आहे.

दरम्यान, त्याने फिर्यादी यांना भेटून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देतो, असे आश्वासन त्याने दिले. त्यानुसार, फिर्यादी यांनी रवी गवळी याच्याकडे विश्वासाने पंधरा लाख रुपये दिले. त्यातील तेरा लाख 13 हजार रुपये रवी याने वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button