मोशी : वेग नियंत्रणासाठी महामार्गावर रम्बलर स्ट्रीप | पुढारी

मोशी : वेग नियंत्रणासाठी महामार्गावर रम्बलर स्ट्रीप

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशीमधून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने भरधाव वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रम्बलर स्ट्रीप बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त
केले आहे.

आठवड्याभरात काम पूर्ण होणार
मोशी महामार्गावर गायत्री स्कूल, गंधर्वनगरी, साईनाथ हॉस्पिटल, काजळे पंप, कचरा डेपो रस्ता, बाजार समिती चौक, हिरामण बोराटे चौक, बोराटेवस्ती, गोल्डन पाम्स, बनकरवस्ती, मोशी मुख्य चौक आदी ठिकाणी स्ट्रीप बसविण्यात येणार आहेत. गायत्री स्कूल येथून कामास सुरुवात झालेली असून, येत्या आठवड्यात सर्व ठिकाणी काम पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त  केला आहे.

हे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिक संतोष बोराटे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तर, ‘पुढारी’ने याबाबत वास्तववादी वृत्त प्रसिद्ध करत आवाज उठवला होता. त्याला यश आले असून, महामार्गावर जोरात काम सुरू
झाले आहे.

रम्बलर स्ट्रीपचे असे असते काम
महामार्गावर दुभाजकालगत जाड पांढरे पट्टे मारले जातात. त्यामुळे रस्त्यावर भरधाव येणार्‍या वाहनांच्या टायरचे आणि पट्ट्यांचे घर्षण होऊन वेगाला रोधक तयार होतो. समांतर अनेक पट्टे असल्याने हळूहळू वेग नियंत्रित होते.
पांढरे पट्टे असल्याने रात्रीच्या वेळी ते चमकतात. यामुळे दुरूनच चालक दुभाजक आल्याचे समजून वाहने सावकाश घेतो.

Back to top button