पिंपरी : ‘हॉल्ट’न दिल्याने पोलिस कर्मचारी निलंबित | पुढारी

पिंपरी : ‘हॉल्ट’न दिल्याने पोलिस कर्मचारी निलंबित

पिंपरी : मुख्यालयाला अचानक भेट दिल्यानंतर गार्ड ड्युटीवरील कर्मचार्‍याने ‘हॉल्ट’ (ओळख पटवण्यासाठी दिला जाणारा आवाज) पुकारला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी मंगळवारी (दि. 27) रात्री याबाबतचे आदेश दिले आहेत.पोलिस शिपाई रोहित राजू संसारे, असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निगडी येथे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मुख्यालय आहे.

सोमवारी रात्री पोलिस शिपाई संसारे यांच्यासह पोलिस शिपाई माने, पोलिस नाईक काळोखे आणि पोलिस शिपाई तरटे यांना गार्ड ड्युटी लावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी मुख्यालयास भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली. त्या वेळी पोलिस शिपाई संसारे जागेवर दिसून आले नाहीत. तसेच, त्यांनी कोणत्याही प्रकारचा हॉल्ट पुकारला नाही. पोलिस मुख्यालयात शस्त्रसाठा असल्याने या ठिकाणी अत्यंत संवेदनशीलपणे कर्तव्य बजावणे अपेक्षित असते. मात्र, संसारे यांनी कर्तव्य करत असताना बेजबाबदार व निष्काळजीपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्तांच्या आक्रमक पविर्त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button