पूर्ववैमनस्यातून धायरीत तरुणावर कोयत्याने वार | पुढारी

पूर्ववैमनस्यातून धायरीत तरुणावर कोयत्याने वार

धायरी; पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून धायरी परिसरातील चार-पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यामध्ये आदेश सुरेश सोनावणे (वय 30, रा. मातोश्री निवास, महादेवनगर, धायरी) हा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश आणि एका विधिसंघर्षित बालक यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. बुधवारी सकाळी तो धारेश्वर मंदिराजवळील त्यांच्या घराशेजारी असलेल्या न्यू हॉटेल समाधानसमोर थांबलेला होता.

त्या वेळी संशयित आरोपी असलेल्या विधिसंघर्षित बालक आणि त्याचे चार साथीदार आले. त्यांनी त्यांच्या बॅगेतून आणलेले कोयत्यासारखे शस्त्र बाहेर काढून फिर्यादी तरुणावर वार केले. संशयित आरोपींनी फिर्यादींच्या उजव्या हातावर आणि डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. यातील संशयित आरोपी असलेली दोन विधिसंघर्षित बालके फरार आहेत. याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करीत आहेत.

Back to top button