पिंपरी : क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक मंगळवारी | पुढारी

पिंपरी : क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक मंगळवारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने सन 2022-23 या वर्षात आयोजित केली जाणारी शहर शालेय क्रीडा स्पर्धाच्या नियोजनसंदर्भात पालिका व खासगी शाळांच्या क्रीडा शिक्षकांची बैठक मंगळवारी (दि.4) आयोजित केली आहे. बैठक संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. बैठकीस सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी बुधवारी (दि.28) केले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धा ऑक्टोबर महिन्यापासून घेण्यात येणार आहेत. त्यात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी-खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. सर्व खेळाडूंच्या प्रवेशिका ऑनलाइन माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहेत. बैठकीत त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. खासगी शाळा स्पर्धा आयोजनाबाबत उत्सुक असल्यास त्यांची पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेने किमान दोन सांघिक खेळामध्ये आणि एका वैयक्तिक खेळात सहभागी होणे बंधनकारक आहे, असे उपायुक्त जोशी यांनी सांगितले.

Back to top button