खडकी बाजार परिसरात सराइतांचा राडा; अकरा जणांना अटक | पुढारी

खडकी बाजार परिसरात सराइतांचा राडा; अकरा जणांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून दोन सराईत गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना 23 सप्टेंबरला रात्री सव्वाअकराच्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही गटांतील 11 जणांना अटक केली आहे. शुभम बाळकृष्ण उमाळे (वय 23), दीपक राजेंद्र डोके (वय 26), हितेश ऊर्फ बापू सतीश चांदणे (वय 22), प्रज्योत ऊर्फ मोन्या बाळकृष्ण उमाळे (वय 21), आकाश ऊर्फ आकू संजय वाघमारे (वय 22), सलमान नासिर शेख (वय 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रब्बील शेख (वय 21) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रब्बील आणि त्यांचा मित्र 23 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून खडकीकडे निघाले होते, त्या वेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी रब्बीलवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेले त्यांचे मित्र सुदर्शन अडसूळ, मझहर शेख, रफिक रब्बानी, आकिब खान, प्रतीक सपकाळ यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एपीआय अमर कदम तपास करीत आहेत.

शुभम उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रब्बील रज्जाक शेख (वय 31), शहबाज सलीम शेख (वय 18), रब्बीन रफिक शेख (वय 25), प्रतीक सचिन सपकाळ (वय 24), मुस्तफा जहीर खान (वय 25) यांना अटक केली आहे. किरण खुडे, दीपक डोके, मोन्या उमाळे, हितेश ऊर्फ बापू चांदणे, सलमान नासिर शेख, आकाश ऊर्फ अक्कू वाघमारे अशी जखमींची नावे आहेत. आरोपींनी हातात शस्त्रास्त्रे घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविली आहे.

Back to top button