धनकवडी : स्वागतासाठी उभारलेल्या कमानीला फासले काळे | पुढारी

धनकवडी : स्वागतासाठी उभारलेल्या कमानीला फासले काळे

धनकवडी : सातारा रस्त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीला अज्ञात व्यक्तींनी काळे फासले आहे. धनकवडीतील अहिल्यादेवी चौकात हा प्रकार घडला. बारामती मतदासंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करणे व भाजपला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली आहे.

सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृह परिसरात आमदार भीमराव तापकीर यांच्यामार्फत गुरुवारी (दि. 22) निर्मला सीतारामन यांचे स्वागत करण्यासाठी कमान लावण्यात आली होती. या कमानीवर काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी काळे फासले. भाजपकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

Back to top button